लातूर, दि. २९ – पारंपरिक शिक्षणापेक्षा कोशल्य अधारित शिक्षण देण्याचा विडा डॉ. एम. आर. पाटील यांनी २४ वर्षांपूर्वी घेतला. काळाची पावले ओळखून त्यांनी उचललेले हे पाऊल विद्यार्थ्यांना मोठ्या पगारीच्या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी आज उपयोगी ठरत आहे.
आज पारंपरिक पध्दतीने शिक्षण घेऊन लाखो तरुण बेरोजगार आहेत. अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्यांनाही नोकऱ्या मिळत नाहीत.परंतु, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयटी कंपन्याच आपल्याकडे येऊन नोकरीसाठी कोणते शिक्षण असावे, याचे प्रशिक्षण देतात, ही गौरवास्पद बाब आहे. हे फक्त लातूरमध्येच होऊ शकते, याचा एक भूमिपुत्र म्हणून मला अभिमान आहे, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. एम. आर. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण मिळून त्यांना मल्टीनॅशनल आयटी कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाव्यात, जगातील कंपन्यांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी मिळावी, यासाठी मागील २४ वर्षांपूर्वी कॉक्सिटची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात यश आले आहे. नोकऱ्या करीत-करीत विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणही घेण्याची सोय आहे. आजपर्यंत कॉक्सिटसोबत विप्रो सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सामंजस्य करार केले आहेत. नोकरभरतीपूर्वी सर्व आयटी कंपन्या कॉक्सिटशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची निवड करतात, असे डॉ. एम. आर. पाटील यांनी सांगितले.
प्रास्ताविकात प्रा. कैलास जाधव यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा चढता आलेख सादर केला. यावर्षी पदवी उत्तीर्ण झालेले आतापर्यंतचे २५५ व निवड जाहिर होणारे १०० पेक्षा जास्त असे एकूण ३५० विद्यार्थी यांना नोकरी मिळेल. एकेका विद्यार्थ्याला एकाचवेळी दोन-चार कंपन्यांच्या ऑफर येत आहेत, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून प्रा. सुषमा मुंडे यांनी आभार मानले.






















