Homeताज्या बातम्याजागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये सुमारे ५ हजार जणांचा योगाभ्यास ! " जिल्हा...

जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये सुमारे ५ हजार जणांचा योगाभ्यास ! ” जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद “

लातूर, दि. २१ : अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे ५ हजार नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन योगाभ्यास केला. यावेळी आमदार विक्रम काळे, प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा प्रशासन, लातूर शहर महानगरपालिका, पतंजली योग समिती आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मठपती, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सुधीर बनशेळकीकर, श्रुष्टी जगताप यांच्यासह पतंजली योग समिती आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. योग शिक्षक विष्णू भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योगाभ्यास केला. आयुष मंत्रालयाने निश्चित केलेल्या योगासनांची प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली.

जगभरात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. योग हा आपल्या देशाचा समृद्ध सांस्कृतिक ठेवा असून, निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करावा, असे प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी सांगितले. योगाभ्यास केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता, तो दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असेही त्या म्हणाल्या.

दयानंद वाणिज्य महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालय, जयक्रांती महाविद्यालय, केशवराज विद्यालय, शिवाजी माध्यमिक विद्यालय, देशी केंद्र विद्यालय, राजस्थान विद्यालय, ज्ञानेश्वर विद्यालय, सरस्वती माध्यमिक विद्यालय, जिजामाता कन्या प्रशाला, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, प्रयागबाई पाटील कनिष्ठ महाविद्यालय, राजमाता जिजामाता विद्यालय, परिमल माध्यमिक विद्यालय, सदानंद माध्यमिक विद्यालय, आर. एन. मोटेगावकर विद्यालय, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यासह इतर शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

प्रास्ताविक जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सुधीर बनशेळकीकर यांनी केले. आयुष मंत्रालयामार्फत योगविषयक जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे प्रादेशिक व्यवस्थापक सौ. अनघा शैलेश बारटक्के यांचे स्वागत : कामगारांच्या...

0
छत्रपती संभाजीनगर :  प्रसिद्धी प्रमुख : अनिल कोकणे, आज दिनांक ३०/६/२०२५ रोजी राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेचे  अध्यक्ष तथा शिवसेना प्रवक्ते मा.श्री किरण पावसकर साहेब...

थेट मंदिरातच घेतले मासिक पाळी विषयीचे चर्चा सत्र :

0
मनोगत :           5,6 दिवसापूर्वी मी एक पोस्ट केली होती "अशी आजी प्रत्येकीला हवी." ही पोस्ट केल्या नंतर मला एक प्रश्न पडला,सगळ्याच...

कौशल्य अधारित शिक्षणामुळे कॉक्सिट नोकऱ्या देण्यात पुढे : आ. अभिमन्यू पवार आयटी कंपन्यांमध्ये...

0
लातूर, दि. २९ - पारंपरिक शिक्षणापेक्षा कोशल्य अधारित शिक्षण देण्याचा विडा डॉ. एम. आर. पाटील यांनी २४ वर्षांपूर्वी घेतला. काळाची पावले ओळखून त्यांनी उचललेले हे...

” डॉ. शुभम पांडुरंग कोकणे यांचा वैद्यकीय पदवीदान सोहळा संपन्न “

0
लातूर : दि. 20, लातूर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून गांधी चौक पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पांडुरंग अंकुशराव कोकणे यांचा मुलगा डॉ. शुभम...

मध्यवर्ती बसस्थानक, जुना रेणापूर नाका बसस्थानकावरून २३ जून पासून सुटणाऱ्या बस फेऱ्यांचे नियोजन...

0
लातूर, दि. २०: शहरातील गांधी चौक येथील मध्यवर्ती बस स्थानक क्र. १ आणि अंबेजोगाई रोडवरील जुना रेणापूर नाका येथील बसस्थानक क्र. २ येथून सुटणाऱ्या...

error: Content is protected !!