Homeताज्या बातम्याराष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे प्रादेशिक व्यवस्थापक सौ. अनघा शैलेश बारटक्के यांचे स्वागत :...

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे प्रादेशिक व्यवस्थापक सौ. अनघा शैलेश बारटक्के यांचे स्वागत : कामगारांच्या विविध प्रश्नावर सखोल चर्चा, तातडीने उपाययोजनांची मागणी.

छत्रपती संभाजीनगर :  प्रसिद्धी प्रमुख : अनिल कोकणे,

आज दिनांक ३०/६/२०२५ रोजी राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेचे  अध्यक्ष तथा शिवसेना प्रवक्ते मा.श्री किरण पावसकर साहेब यांच्या आदेशानुसार व राज्य सरचिटणीस श्री व्यंकटराव बिरादार, राज्य संघटक सचिव श्री सय्यद नजीब राऊफ,  यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शेख इमरान जिलानी, विभागीय कार्याध्यक्ष यांच्या नियोजनाने तसेच श्री नवनाथ बोडखे, श्री शशिकांत बिहारीलाल दुर्बे, श्री उल्हास चव्हाण, श्री विजय खेडकर, श्री गजानन केनेकर, श्री कळुबा गावंडे पाटील, यांच्या मदतीने संभाजीनगर/नाशिक नियंत्रण समिती क्रमांक दोनच्या प्रादेशिक व्यवस्थापक पदी नियुक्त झालेल्या सौ. अनघा शैलेश बारटक्के मॅडम यांचे संघटनेने नुकतेच जंगी स्वागत केले. याप्रसंगी गुणवंत कामगार श्री नवनाथ बोडखे यांनी सूत्रसंचालन केले. संघटनेच्या राज्य सरचिटणीस श्री व्यंकट बिराजदार यांनी सौ. बारटक्के मॅडम यांच्याशी कामगारांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर सखोल चर्चा केली आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच, राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेची महाराष्ट्र /केंद्रीय कार्यकारणी ची एक प्रत देण्यात आली.
या बैठकीत खालील प्रमुख आणि गंभीर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली:
चालक विश्रांती सुविधा : छत्रपती संभाजीनगर प्रदेशातील चालकांच्या विश्रांतीसाठी असलेल्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. सध्याच्या सुविधा अपुऱ्या असून, त्यांची तात्काळ दुरुस्ती व आधुनिकीकरण करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
हैदराबाद येथील विश्रांतीगृह : मराठवाडा विभागातून हैदराबाद येथे मुक्कामी जाणाऱ्या चालक व वाहकांसाठीच्या विश्रांतीगृहात विशेष आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी करण्यात आली.
वल्लभनगर (पुणे) येथील विश्रांतीगृह : वल्लभनगर (पुणे) येथील विश्रांतीगृहात ढेकूण आणि चिरटांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्याने कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी तातडीने कीटकनाशक फवारणी करून स्वच्छता राखण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
अधिकारी व कर्मचारी विश्रांतीगृहांची दुरुस्ती : छत्रपती संभाजीनगर प्रदेशातील अधिकारी व कर्मचारी विश्रांतीगृहांची दुरवस्था झाली असून, त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
समांतर वाहतुकीवर नियंत्रण : समांतर वाहतुकीमुळे एसटीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत असून, ही समांतर वाहतूक बंद करून एसटीच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने कठोर उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला.
चालकांच्या आसनांमध्ये (सीट) सुधारणा : एसटीच्या चालकांच्या बसण्याच्या सीटमुळे (आसनी) त्यांना कंबरदुखी, पाठीच्या मणक्याचा आजार आणि अन्य शारीरिक त्रास होत आहेत. यामुळे सुरक्षित प्रवासात बाधा येत असल्याने, या सीटमध्ये तात्काळ सुधारणा करून अधिक आरामदायी आणि आरोग्यदायी सीट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार बदल्या : कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार बदल्यांबाबतच्या धोरणावर चर्चा झाली. अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रलंबित असून, त्या लवकर मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.
सौ. सुजाता आकाश म्हस्के यांच्या रजेचा प्रश्न : लिपिक पदावर कार्यरत असलेल्या सौ. सुजाता आकाश म्हस्के यांच्या गर्भपात विशेष रजेबाबत आणि त्यासाठी १०० रुपयांच्या बॉन्ड पेपरची मागणी करण्याच्या तक्रारीबाबत चर्चा झाली. ही अन्यायकारक मागणी असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
पदोन्नती धोरण : चालक, वाहक, यांत्रिक, शिपाई आणि तत्सम संवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक टंकलेखक संवर्गात पदोन्नती देण्याबाबतच्या धोरणावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह वाढेल आणि त्यांच्या करिअरला गती मिळेल असे संघटनेने म्हटले.
याव्यतिरिक्त, कामगारांच्या अनेक इतर प्रश्नांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय कर्मचारी सेनेने सौ. अनघा बारटक्के मॅडम यांच्याकडून या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून त्या सोडवण्यासाठी तातडीने पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. सौ. बारटक्के मॅडम यांच्या आगमनाने एसटी महामंडळ अधिक मजबूत होईल आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला. यावेळी राष्ट्रीय कर्मचारी संघटनेचे छत्रपती संभाजी नगर विभागाचे सर्व आगार अध्यक्ष व सचिव आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

थेट मंदिरातच घेतले मासिक पाळी विषयीचे चर्चा सत्र :

0
मनोगत :           5,6 दिवसापूर्वी मी एक पोस्ट केली होती "अशी आजी प्रत्येकीला हवी." ही पोस्ट केल्या नंतर मला एक प्रश्न पडला,सगळ्याच...

कौशल्य अधारित शिक्षणामुळे कॉक्सिट नोकऱ्या देण्यात पुढे : आ. अभिमन्यू पवार आयटी कंपन्यांमध्ये...

0
लातूर, दि. २९ - पारंपरिक शिक्षणापेक्षा कोशल्य अधारित शिक्षण देण्याचा विडा डॉ. एम. आर. पाटील यांनी २४ वर्षांपूर्वी घेतला. काळाची पावले ओळखून त्यांनी उचललेले हे...

जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये सुमारे ५ हजार जणांचा योगाभ्यास ! ” जिल्हा क्रीडा संकुल...

0
लातूर, दि. २१ : अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे ५ हजार नागरिकांनी या...

” डॉ. शुभम पांडुरंग कोकणे यांचा वैद्यकीय पदवीदान सोहळा संपन्न “

0
लातूर : दि. 20, लातूर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून गांधी चौक पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पांडुरंग अंकुशराव कोकणे यांचा मुलगा डॉ. शुभम...

मध्यवर्ती बसस्थानक, जुना रेणापूर नाका बसस्थानकावरून २३ जून पासून सुटणाऱ्या बस फेऱ्यांचे नियोजन...

0
लातूर, दि. २०: शहरातील गांधी चौक येथील मध्यवर्ती बस स्थानक क्र. १ आणि अंबेजोगाई रोडवरील जुना रेणापूर नाका येथील बसस्थानक क्र. २ येथून सुटणाऱ्या...

error: Content is protected !!