Homeताज्या बातम्याऑपरेशन सिंदूर'च्या यशाचा लातूरमध्ये अभाविपकडून जल्लोष, ...

ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा लातूरमध्ये अभाविपकडून जल्लोष, बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात आनंदोत्सव; साखर वाटून भारतीय सशस्त्र दलांचे गौरवगान

लातूर, दि. ७ मे — भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत देशविरोधी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या निर्णायक कारवाईचे देशभरात जल्लोषात स्वागत केले जात आहे. या ऐतिहासिक कामगिरीचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) लातूर शाखेच्या वतीने बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात विशेष आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थित सर्वांना साखर वाटून देशाच्या वीर जवानांच्या यशाचे व त्यांच्या शौर्याचे गौरवगान करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून लातूर महानगर मंत्री तेजुमई राऊत, जिल्हा सहसंयोजक भागवत बिरादार, सहमंत्री शुभम क्षीरसागर, ‘खेलो भारत’ संयोजक सोनिया जायभाय, रेवती माळी तसेच इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वक्त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या महत्त्वावर भाष्य करत भारतीय सशस्त्र दलांचे आभार मानले आणि त्यांच्या कार्याबद्दल अभिमान व्यक्त केला.
तेजुमई राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भारतीय लष्कराने फक्त दहशतवाद्यांवर विजय मिळवला नाही, तर देशातील नागरिकांच्या मनामध्ये आत्मविश्वासाची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे. हा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे प्रादेशिक व्यवस्थापक सौ. अनघा शैलेश बारटक्के यांचे स्वागत : कामगारांच्या...

0
छत्रपती संभाजीनगर :  प्रसिद्धी प्रमुख : अनिल कोकणे, आज दिनांक ३०/६/२०२५ रोजी राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेचे  अध्यक्ष तथा शिवसेना प्रवक्ते मा.श्री किरण पावसकर साहेब...

थेट मंदिरातच घेतले मासिक पाळी विषयीचे चर्चा सत्र :

0
मनोगत :           5,6 दिवसापूर्वी मी एक पोस्ट केली होती "अशी आजी प्रत्येकीला हवी." ही पोस्ट केल्या नंतर मला एक प्रश्न पडला,सगळ्याच...

कौशल्य अधारित शिक्षणामुळे कॉक्सिट नोकऱ्या देण्यात पुढे : आ. अभिमन्यू पवार आयटी कंपन्यांमध्ये...

0
लातूर, दि. २९ - पारंपरिक शिक्षणापेक्षा कोशल्य अधारित शिक्षण देण्याचा विडा डॉ. एम. आर. पाटील यांनी २४ वर्षांपूर्वी घेतला. काळाची पावले ओळखून त्यांनी उचललेले हे...

जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये सुमारे ५ हजार जणांचा योगाभ्यास ! ” जिल्हा क्रीडा संकुल...

0
लातूर, दि. २१ : अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे ५ हजार नागरिकांनी या...

” डॉ. शुभम पांडुरंग कोकणे यांचा वैद्यकीय पदवीदान सोहळा संपन्न “

0
लातूर : दि. 20, लातूर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून गांधी चौक पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पांडुरंग अंकुशराव कोकणे यांचा मुलगा डॉ. शुभम...

error: Content is protected !!