मनोगत : 5,6 दिवसापूर्वी मी एक पोस्ट केली होती “अशी आजी प्रत्येकीला हवी.”
ही पोस्ट केल्या नंतर मला एक प्रश्न पडला,सगळ्याच आजी या अश्या आहेत का खरच ?
किशोरवईन मुलींना बोलताना कळले की त्यांच्या आजीकडून त्यांना
“मुली पाळीच्या दिवसामध्ये लोणचाच्या भरणीला हात नको लावू,तुळशी च्या जवळ जाऊ नको,त्या दिवसात सोयपाक घरात नको येऊ,देवघरात नको जाऊ, पूजा पाठ नको करू असे एक नाही अनेक सल्ले आजी आणि आई मुलींना मिळतात.
ठरलं तर मग…आई आणि आजीला अगोदर या विषयावर बोलायचं.
झाडाच्या मुळाला खत, पाणी दिले की झाड अजून जास्त रुजते, हा प्रकारे घरामधल्या वयस्कर व्यक्ती बद्दल असू शकतो.त्यांचा विचारांमध्ये बदल झाला तर पुढच्या पिढीला अडथळा येणार नाही.
त्या निमित्ताने तळेगाव दाभाडे येथील दत्त मंदिरात मासिक पाळी आणि महिलांचे आरोग्य,मासिक पाळी विषयी गैरसमज आणि स्वच्छता या विषयावर चर्चा सत्र मी घेतली.
मासिक पाळी का येते यावर मी सविस्तर माहिती दिली,पाळी हा विटाळ नसून नवनिर्मितीची प्रक्रिया आहे असे सांगुन त्या दिवसात शारीरिक स्वच्छता करणे किती आवश्यक आणि कशी करावी सांगितले.या नंतर महिलाचा छान प्रतिसाद मिळाला.त्या म्हणाल्या आम्ही पण आता आमच्या पासून सुरुवात करू पाळी बद्दल गैरसमज दूर करण्याचा.आमच्या मुलींना, सुनांना आणि नातीला त्या दिवसात विटाळ म्हणून हीन वागणूक देणार नाही.
हा सकारात्मक बदल त्याच्यातला बघून खूप बरं वाटलं. असे मत पुष्पा शहारे यांनी व्यक्त केले.






















