Homeउद्योगमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत महत्त्वपूर्ण बदल; प्रकल्प मर्यादा वाढवून अनुदानातही वाढ

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत महत्त्वपूर्ण बदल; प्रकल्प मर्यादा वाढवून अनुदानातही वाढ

ब्रेकिंग न्यूज
राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे प्रादेशिक व्यवस्थापक सौ. अनघा शैलेश बारटक्के यांचे स्वागत : कामगारांच्या विविध प्रश्नावर सखोल चर्चा, तातडीने उपाययोजनांची मागणी.थेट मंदिरातच घेतले मासिक पाळी विषयीचे चर्चा सत्र :कौशल्य अधारित शिक्षणामुळे कॉक्सिट नोकऱ्या देण्यात पुढे : आ. अभिमन्यू पवार आयटी कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळालेल्या २५५ विद्यार्थ्यांचे कॉक्सिटमध्ये कौतुक; कॉक्सिटच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा पवार यांच्या हस्ते शुभारंभजागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये सुमारे ५ हजार जणांचा योगाभ्यास ! ” जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद “” डॉ. शुभम पांडुरंग कोकणे यांचा वैद्यकीय पदवीदान सोहळा संपन्न “मध्यवर्ती बसस्थानक, जुना रेणापूर नाका बसस्थानकावरून २३ जून पासून सुटणाऱ्या बस फेऱ्यांचे नियोजन जाहीरमांजरा प्रकल्प व जलशुद्धीकरण केंद्रास आयुक्तांची भेट : मलनि:सारण प्रकल्पांचीही केली पाहणी.शिवा लिंगायत युवक संघटनेच्या वतीने कर्मयोगी लिंगायत रत्न पुरस्कार सांबअप्पा गिरवलकर यांना गिरवलकर मंगल कार्यालय प्रदानशासनमान्य शाळेतच पाल्यांचे प्रवेश घेण्याचे आवाहन ; अनधिकृत शाळांची 23-24 जूनला शोध मोहीमजागतिक योगा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात लातूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

लातूर, दि. १२(जिमाका): सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत. याबाबतचा सुधारित शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत आता सेवा उद्योग, कृषिपूरक व्यवसाय, कृषिवर आधारित उद्योग, ई-वाहतूक, ब्रँड आधारित साखळी विक्री केंद्रे, फिरते विक्री केंद्रे, खाद्यपदार्थ केंद्रे, कुक्कुटपालन, अंडी उबवणी केंद्रे, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, हॉटेल, धाबा, शाकाहारी-मांसाहारी पदार्थ विक्री, होम स्टे, क्लाऊड किचन, जलक्रीडा, मासेमारी, आणि प्रवासी वाहतुकीसाठी बोट व्यवसाय यांचा समावेश करण्यात आला आहे.
यापूर्वी अनुसूचित जाती-जमातींसाठी 50 वर्षे आणि इतर प्रवर्गांसाठी 45 वर्षे असलेली वयोमर्यादा आता पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. तसेच, सेवा उद्योग आणि कृषी पूरक उद्योगांसाठी प्रकल्पाची कमाल किंमत 20 लाखांवरून 50 लाख रुपये, तर उत्पादन उद्योगांसाठी 50 लाखांवरून 1 कोटी रुपये करण्यात आली आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी सेवा उद्योगात शहरी भागात 25 टक्के (कमाल 5 लाख रुपये) आणि ग्रामीण भागात 35 टक्के (कमाल 7 लाख रुपये) अनुदान दिले जाणार आहे. उत्पादन उद्योगांसाठी हे अनुदान अनुक्रमे 25 टक्के (कमाल 12.50 लाख रुपये) आणि 35 टक्के (कमाल 17.50 लाख रुपये) आहे. इतर प्रवर्गांसाठी सेवा उद्योगात शहरी भागात 15 टक्के (कमाल 3 लाख रुपये) आणि ग्रामीण भागात 25 टक्के (कमाल 5 लाख रुपये), तर उत्पादन उद्योगांसाठी शहरी भागात 15 टक्के (कमाल 7.50 लाख रुपये) आणि ग्रामीण भागात 25 टक्के (कमाल 12.50 लाख रुपये) अनुदान मिळेल.
या योजने अंतर्गत कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना सेवा उद्योग आणि कृषी पूरक उद्योगांसाठी एक आठवडा, तर उत्पादन उद्योगांसाठी दोन आठवड्यांचे उद्योजकीय प्रशिक्षण अनिवार्य आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्यांनाच कर्ज आणि अनुदान मिळेल. लाभार्थ्यांना प्रशिक्षण पद्धती आणि केंद्र निवडण्याची मुभा आहे. तरी इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे प्रादेशिक व्यवस्थापक सौ. अनघा शैलेश बारटक्के यांचे स्वागत : कामगारांच्या...

0
छत्रपती संभाजीनगर :  प्रसिद्धी प्रमुख : अनिल कोकणे, आज दिनांक ३०/६/२०२५ रोजी राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेचे  अध्यक्ष तथा शिवसेना प्रवक्ते मा.श्री किरण पावसकर साहेब...

थेट मंदिरातच घेतले मासिक पाळी विषयीचे चर्चा सत्र :

0
मनोगत :           5,6 दिवसापूर्वी मी एक पोस्ट केली होती "अशी आजी प्रत्येकीला हवी." ही पोस्ट केल्या नंतर मला एक प्रश्न पडला,सगळ्याच...

कौशल्य अधारित शिक्षणामुळे कॉक्सिट नोकऱ्या देण्यात पुढे : आ. अभिमन्यू पवार आयटी कंपन्यांमध्ये...

0
लातूर, दि. २९ - पारंपरिक शिक्षणापेक्षा कोशल्य अधारित शिक्षण देण्याचा विडा डॉ. एम. आर. पाटील यांनी २४ वर्षांपूर्वी घेतला. काळाची पावले ओळखून त्यांनी उचललेले हे...

जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये सुमारे ५ हजार जणांचा योगाभ्यास ! ” जिल्हा क्रीडा संकुल...

0
लातूर, दि. २१ : अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे ५ हजार नागरिकांनी या...

” डॉ. शुभम पांडुरंग कोकणे यांचा वैद्यकीय पदवीदान सोहळा संपन्न “

0
लातूर : दि. 20, लातूर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून गांधी चौक पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पांडुरंग अंकुशराव कोकणे यांचा मुलगा डॉ. शुभम...

error: Content is protected !!