Homeताज्या बातम्याश्रीमती मानसी मॅडम यांनी स्वीकारला मनपा आयुक्त पदाचा पदभार

श्रीमती मानसी मॅडम यांनी स्वीकारला मनपा आयुक्त पदाचा पदभार

लातूर /प्रतिनिधी :भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी श्रीमती मानसी मॅडम यांनी शुक्रवारी (दि. १३) लातूर शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी विविध विभागांचा सुमारे ५ तास आढावा घेतला.लातूर महानगरपालिकेचा लौकिक वृद्धिंगत करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वजण मिळून काम करू,असे त्या म्हणाल्या.
श्रीमती मानसी मॅडम या देसाईगंज उपविभागात सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या.तेथून त्यांची लातूर मनपा आयुक्त म्हणून नुकतीच बदली झाली.शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
श्रीमती मानसी मॅडम यांनी लागलीच एका मागोमाग एक पालिकेतील सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेतला. सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत सर्व विभागांच्या बैठका त्यांनी घेतल्या. काम करताना पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उद्दिष्ट समोर ठेवावे. कमी कालावधीत पूर्ण होणारी व दीर्घ कालावधी लागणारी कामे असे वर्गीकरण करून ही उद्दिष्टे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.शहरातील नागरिकांना मनपाकडून अधिकाधिक सेवा- सुविधा देता याव्यात यासाठी आपण सर्वांनी काम करायचे आहे. यामाध्यमातून लातूर महानगरपालिकेचा लौकिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्वजण मिळून काम करू,असे श्रीमती मानसी मॅडम यावेळी बोलताना म्हणाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे प्रादेशिक व्यवस्थापक सौ. अनघा शैलेश बारटक्के यांचे स्वागत : कामगारांच्या...

0
छत्रपती संभाजीनगर :  प्रसिद्धी प्रमुख : अनिल कोकणे, आज दिनांक ३०/६/२०२५ रोजी राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेचे  अध्यक्ष तथा शिवसेना प्रवक्ते मा.श्री किरण पावसकर साहेब...

थेट मंदिरातच घेतले मासिक पाळी विषयीचे चर्चा सत्र :

0
मनोगत :           5,6 दिवसापूर्वी मी एक पोस्ट केली होती "अशी आजी प्रत्येकीला हवी." ही पोस्ट केल्या नंतर मला एक प्रश्न पडला,सगळ्याच...

कौशल्य अधारित शिक्षणामुळे कॉक्सिट नोकऱ्या देण्यात पुढे : आ. अभिमन्यू पवार आयटी कंपन्यांमध्ये...

0
लातूर, दि. २९ - पारंपरिक शिक्षणापेक्षा कोशल्य अधारित शिक्षण देण्याचा विडा डॉ. एम. आर. पाटील यांनी २४ वर्षांपूर्वी घेतला. काळाची पावले ओळखून त्यांनी उचललेले हे...

जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये सुमारे ५ हजार जणांचा योगाभ्यास ! ” जिल्हा क्रीडा संकुल...

0
लातूर, दि. २१ : अकराव्या जागतिक योग दिनानिमित्त लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाला लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे ५ हजार नागरिकांनी या...

” डॉ. शुभम पांडुरंग कोकणे यांचा वैद्यकीय पदवीदान सोहळा संपन्न “

0
लातूर : दि. 20, लातूर येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून गांधी चौक पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पांडुरंग अंकुशराव कोकणे यांचा मुलगा डॉ. शुभम...

error: Content is protected !!